उमरगा (लक्ष्मण पवार)  नळवाडी ता. उमरगा येथील एका निर्धार महिलेची  झोपडी दि. 1 डिसेंबर रोजी जळाल्याने मोठे   नुकसान  होवुन तिचा संसार उघडयावर पडले होते.  आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नळवाडी गावास प्रत्यक्ष भेट देऊन सदर महिलेस संसार उपयाेगी साहित्याची मदत केली.
   नळवाडी येथील विनिता किसन दाशमे या नातेवाईकांकडे पुण्याला गेल्या होत्या .त्यांचे गाव शिवारातील झोपडी  पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक झाली. यात रोक रक्कम 5000 व संसार उपयोगी साहित्य, धान्य असे मिळुन सुमारे एक लाख रूपयेचे नुकसान  झाले होते. सदरची महिला निर्धार असून या घटनेमुळे तिचा संसार उघडयावर अल्याने ,या घटनेची माहिती समजताच  आ. ज्ञानराज चौगुले यांनी घटनास्‍थळी भेट देऊन सदर महिलेस विविध संसार उपयोगी वस्तू व साडी चोळीची मदत केली. तसेच सदर महिलेस शासनाकडून  नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची ग्वाही आ. चौगुले यांनी यावेळी दिली.
    यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष व्यंकट कवठे, उपसरपंच  बंकट कवठे,  बळीराम कवठे,  शरद कवठे, तुकाराम कवठे, आदी ग्रामस्थ्‍ा उपस्थित होते.
 
Top