उमरगा (लक्ष्मण पवार) उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा 3 किमी चा जोडरस्ता दुरूस्त करावा म्हणून वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरठा करूनही रस्ता दुरूस्त केला जात नसल्यामुळे जगदाळवाडी येथील 35 जेष्ठ महिला पुरूष नागरीक व जवळपास 150 चिमुकले शाळकरी विदृयार्थी महाराष्ट्र विकास सेनेच्या अधिपत्याखली उपविभागीय कार्यकारी अधिकारी त्यांच्या कार्यालयासमोर गुरूवार दि. 5 रोजी पासून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
       उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महामार्ग क्र. 9 ते जगदाळवाडी या  3 कि.मी मुख्य जोड रस्त्यांची दुरावस्‍था झाली आहे.  या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे धोकादायक झालेले आहे. या रस्त्याचा दुरुस्‍तीबाबत  आदेश शासनामार्फत झालेला होता. अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. परंतू अर्ध्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम शिल्लक असून मौजे तलमोड येथील   कांही शेतक-यांनी  अडवणूक करून सदर रस्तादुरूस्तीचे काम बंद केल्‍याचे आरोप करुन जोपर्यंत गावात पायी चालण्यासारखा चांगला रस्ता तयार होणार नाही किंवा उर्वरीत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू करण्याचे ठोस कार्यवाही होणार नाही. तोपर्यंत महाराष्ट्र विकास सेना जगदाळवाडी ग्रामस्थ, शेतकारी, महिला, पुरूष शाळकरी विद्यार्थी आमरण अपोषणचे ठिकान सोडणार नसल्याचे म्‍हटले आहे.
   या उपोषणत मविसेचे संस्थापक अध्यक्ष शाहूराज माने,  ग्रामस्थ विश्वंभर जगदाळे, वामन मोरे, शिवाजी मोरे, बालाजी मोरे, पाशुराम जगदाळे, पंडित जगदाळे, अशोक जगदाळे, पांडूरंग चव्हाण, सुधाकर जगदाळे, मारूती भिगोले, आनंद हक्के, दत्तु जगदाळे, माणिक चव्हाण, किसन जगदाळे, दौलत मोरे, रावस जगदाळे, मधुकर जगदाळे, बालाजी चव्हाण, पद्माकर मोरे, अनिल जगदाळे, काशिनाथ चव्हाण, शेषेराव पाटील, विश्वंभर जगदाळे, प्रकाश जगदाळे, रमेश पाटील, कालिदास कुरनूरे, प्रल्हाद चव्हाण, मारूती लिंबोळे, राजेंद्र लोंढे, बाजीराव जगदाळे, रावसाहेब जगदाळे, विलास चव्हाण, आनंद हके,  कलावती जमादार, ललूबाई हके, श्रावण जगदाळे, रणजित राठोड, संतोष धावरे, शिवजी बिराजदार, प्रमीलाबाई लांडगे, आदी 150 शाळकरी चिमुकल्यांचा आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत.
 
Top