बार्शी  : येथील रवि बसवेश्वर कत्ते (वय २३ रा. जावळी प्लॉट) या युवकाने बुधवारी दि. ४ डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्या केली.
    नातेवाईकांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगीतले. ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या खबरीवरुन बार्शी पोलिसांनी अकस्‍मात ङ्कयत अशी नोंद केली आहे. रवि कत्ते हा झाडबुके महाविद्यालयांत २०१० ङ्कध्ये विद्यापीठ प्रतिनिधी व पुढील शिक्षणानंतर सध्या तेथेच प्राध्यापकाचे काम तो करीत होता.
    त्याच्या आमहत्येचे नेमके कारण पोलिसांना अद्याप कळाले नाही. प्राथमिक तपास पो.ना. देशमुख यांनी केला असून पुढील तपास पो.हे.कॉं. सुनिल बनसोडे हे करीत आहेत.
 
Top