उस्मानाबाद :- थेट अर्ज योजनेच्या (फॉर्म नं. 17) खाजगी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-2014 च्या परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून लातूर विभागीय मंडळाकडे नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्रे व परीक्षा शुल्क नियमित शुल्कासह दि. 9 डिसेंबर, 2013 पर्यंत आणि विलंब शुल्कासह दि. 14 डिसेंबर, 2013 पर्यंत श्रीपतराव भोसले हायस्कूल, उस्मानाबाद (मो.नं. 8806665336), आदर्श विद्यालय, उमरगा जि. उस्मानाबाद (मो.नं. 8149542835) या संपर्क केंद्रांवर प्रत्यक्ष संपर्क साधून भरावे, असे विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी कळविले आहे.