उस्मानाबाद :- तामलवाडी (ता. तुळजापूर) येथील हसिना गौसपाड बेगडे (वय 37 वर्ष) व तिचा मुलगा साहील गौसपाड बेगडे (वय 8) हे दोघे 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बाजार करण्याकरीता सोलापूर येथे गेले ते आजपावेतो घरी आले नसल्याची तक्रार गौसपाड जहाँगीर बेगडे यांनी तामलवाडी पोलिसात दिली आहे.
हसीना बेगडे ही महिला रंगाने गोरी, उंची-5 फुट, चेहरा उभट अशा
वर्णनाची असून तिने विटकरी रंगाची साडी व बुरखा परिधान केला होता. साहील
याची उंची -3 फुट, रंग-गोरा, चेहरा उभट असून त्याने अंगात काळी जिन्स
पॅन्ट व पांढरा टी शर्ट असा पोषाख परीधान केला आहे. वरील वर्णनाची महिला व
मुलगा कोणास आढळून आल्यास संबंधितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, तामलवाडी
देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
