पांगरी (गणेश गोडसे) : बार्शी पंचायत समितीस्थरावर तयार करण्यात आलेल्या विशेष वसुली पथकाने ग्रांमपंचायत थकबाकी वसुली माहिम सुरू केली असुन शुभारंभालाच या पथकाला भरभरूण यश आले आहे. कारी (ता. बार्शी) पंचायत समिती गणातील थकबाकी वसुलीचा कारी येथुन श्रीगणेशा करण्यात आला. पंचायत समितीच्या पथकाने राबवलेल्या धडक वसुली मोहिमेत कारी गावात एकाच दिवशी दोन लाख रूपयांच्या पुढे थकबाकी वसुल करण्यात आली. कारी गावात लोकांकडुन विविध करांपोटी 18 लाख रूपयांची येणे बाकी होती. पथकाची धास्ती घेऊन थकबाकीदारांनी तात्काळ पथकांकडे येणेबाकी भरून पथकाचा ससेमिरा सोडवुन घेतला. गटविकास अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला प्रतिसाद वाढत आहे. कारी येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही.के.कशाळे, ग्रामसेवक राहुल गरड, वैभव माळकर, संतोष माने, महेश माने, एस.एस.खोगरे आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच इम्रान मुलाणी, उपसरपंच अतुल चालखोर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हजर होते.
अनेक ग्रामपंचायतींची ग्रामस्थांकडे लाखो रूपयांची येणेबाकी आहे. स्थानिक पातळीवर राजकारणी आपली मतांची वजावट होऊ नये म्हणुन थकबाकी वसुली मोहिम राबवताना चालढकल करतात. परिणामी विविध करांची थकबाकीचा आलेख वाढत आहे. गावच्या विविध दैनंदीन योजना राबवताना थकबाकीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नाकीनऊ येते. वेळप्रसंगी कर्मचा-यांच्या पगाराचीही जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ गांवांना मिळु शकत नाही. त्यामुळे गावाचा व जनतेचा विकास खुंटला जातो व गावे मागे पडतात.
पंचायत समिती वसुली पथक दि.17 डिसेंबर रोजी चिखर्डे, दि.18 डिसेंबर रोजी खामगांव, दि. 20 डिसेंबर रोजी धोत्रे, दि. 21 डिसेंबर रोजी ममदापुर, दि. 24 डिसेंबर रोजी पिंपळगांव, दि. 25 डिसेंबर रोजी झानपुर, दि. 27 डिसेंबर रोजी घोळवेवाडी, दि. 31 डिसेंबर रोजी पांढरी तर नविन वर्षांच्या प्रारंभी दि.1 जानेवारी रोजी चिंचोली, दि. 3 जानेवारीला उक्कडगांव या गावांमध्ये जावुन थकबाकीची वसुली मोहिम राबवणार आहे.

तर जप्तीची कारवाई करणार :
धडक माहिमेच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या थकबाकीदारांनी आपली थकबाकी ग्रामपंचायतीकडे अथवा धडक वसुली पथकाकडे तात्काळ भरावी अन्यथा वसुली माहिम संपल्यानंतर जप्तीची काठोर कारवाई करण्यात येईल. वसुलीचे उदिष्ट पुर्ण करण्यासठी उतारे, दाखले अथवा कोणतीही कागदपत्रे देण्याचे टाळले जाऊ शकते. हे टाळण्यासाठी थकबाकीदारांनी ग्रामपंचायत करांची देणेबाकी भरावी, असे बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी बोलताना सांगितले.