नळदुर्ग -: येथील मैलारपूर (नळदुर्ग) च्या श्री खंडोबाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात जवळपास दहा हजारपेक्षा अधिक भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. येळकोट,येळकोट, जय मल्हार या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
अणदूरच्या श्री खंडोबाचे दि.४ डिसेंबर रोजी मैलारपुरात आगमन झाले आहे. त्यानंतर दर रविवारी येथे मोठी गर्दी होते.त्याला खेटा असे संबोधले जाते. दुस-या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता श्री खंडोबाची महापुजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लागली होती.भाविकांनी भंडारा आणि खोबरे उधळत येळकोट येळकोट, जय मल्हारचा जयघोष केल्यामुळे वातावरण भारावून गेले होते.येणा-या सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले.