नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांची ही लोकप्रियता व त्यांच्याबाबतचे वाढते कुतूहल सोशल मिडियामध्येही दिसून येत आहे
मोदींच्या फेसबुक पेजच्या लाईक सचिन तेंडुलकर आणि अॅपल आयफोन फाईव्ह एस या दोन्ही लोकप्रिय फेसबुक पेजच्या लाईकपेक्षा जास्त झाल्या आहेत. फेसबुकवर भारताशी संबधित ज्या विषयावर वर्षभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली त्यात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संदर्भातील विषय सर्वाधिक होते. या व्यतिरिक्त आरबी आय गर्व्हनर रघुराम राजन आणि भारताची मंगळ मोहिम (इंडियन मार्स मिशन) या विषयांवरही चर्चा झाली मात्र
मोदींच्या संदर्भातल्या चर्चेचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे अढळले आहे. फेसबुकच्या आकडेवारीनुसार नुकत्याच संपलेल्या तिमाहीत मंथली अॅक्टिव्ह यूजर 1.19 अब्ज होते. यात 82 दशलक्ष भारतीय यूजर होते. या यूजरनी नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, ॲपल आयफोन फाईव्ह एस आरबी आय गर्व्हनर रघूराम राजन आणि भारताची मंगळ मोहिम (इंडियन मार्स मिशन) या विषयांवर चर्चा करणे जास्त पसंत केले. अमेरिका, रशिया आणि युरोपमधील निवडक देशांनी महाकाय महत्वाकांक्षा अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या आहेत. मंगळ मोहिममुळे नोहेंबर महिन्यातच या क्लबमध्ये भारताचा सामावेश झाला आहे. याच नोव्हेंबर महिन्यात सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली. त्याची क्रिडा क्षेत्रातील आंतराष्ट्रीय कारकीर्द आहे. या दोन उल्लेखनीय घडामोडीपेक्षाही मोदींच्या संदर्भातल्या चर्चेत फेसबुक यूजरना जास्त रस असल्याचे अढळून आले.