उस्मानाबाद :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्‍हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादी पुरवठा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्या ऐवजी आता १० जानेवारी २०१४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्यासठी मुदतवाढ दिली.
    सदर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसाहयता बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. एकुण सदस्यांपैकी ८०% सदस्य अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. सदर अटी पुर्ण करणा-या बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व इतर साहित्यासाठी शासनाकडुन रु तीन लाख पंधरा हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी २१ मिनी ट्रॅक्टरचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.
      जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांनी कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज चेकलिस्ट  प्रमाणे कागदपत्रासह सादर करावीत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. तसेच प्रलंबित असणा-या बचत गटांनी सुध्दा चालू आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२०१४, २२२३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
Top