उस्मानाबाद -: जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक 2 जानेवारी,2014 रोजी परंडा, 3 रोजी तुळजापूर, 10 रोजी उमरगा, 17 जानेवारी  लोहारा  तर  6 फेब्रुवारी,2014 रोजी कळंब, 13 रोजी वाशी आणि  20 रोजी भूम येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.         
 
Top