उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्याच्या  दौ-यावर येत असून  त्यांचा दौरा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    मंगळवार, दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 9-30 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स.9-50 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता टाटा इन्स्टिटयूट येथील कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 1 वा. पुलवाडी ता.तुळजापूर येथे ग्रामस्थांस भेट व चर्चा. दु.2 वा.  धनगरवाडी ता.तुळजापूर येथे ग्रामस्थांस भेट व चर्चा. दु.3 वा.  सराटी ता.तुळजापूर येथे ग्रामस्थांस भेट व चर्चा.
      सांयकाळी 4 वाजता.  केशेगाव ता.तुळजापूर येथे ग्रामस्थांस भेट व चर्चा. सायंकाळी 5 वा.  निलेगाव  ता.तुळजापूर येथे ग्रामस्थांस भेट व चर्चा. सायंकाळी 6-30 वाजता अणदूर ता. तुळजापूर येथे प्रयाण, आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण.रात्री 10-45 वाजता सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.   
 
Top