उस्मानाबाद :- समुद्रवाणी व कामेगाव (ता. उस्मानाबाद) येथून जवळच असलेल्या तेरणाकाठी (पांढरी) येथे गणेशनाथ महाराज यात्रा सोमवार दि. २ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी झाली.
     गत १३ वर्षापासून गणेशनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त तेरणा नदीकाठी त्यांच्या मंदीर ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान दैनंदिन कार्यक्रम पार पडले. तर २ डिसेंबर रोजी भव्य यात्रा महोत्सव व जंगी कुस्ती कार्यक्रम संपन्न झाला. या यात्रेसाठी परिसरातील कामेगाव, समुद्रवाणी, बोरगाव, पाडोळी, मेंढा, सांगवी, लासोना या गावातील भाविकांची उपस्थिती लावली होती. तसेच रविवार दि.  १ डिसेंबर रोजी यात्रेनिमित्त आयोजित सप्ताहाची समाप्ती झाली. यात प्रमोद मुकडे यांनी शेवटचे अन्नदान दिले. याचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. यात्रेच्या दिवशी मोठ्याप्रमाणावर भाविक भक्‍तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
 
Top