उस्मानाबाद -: शेतातील सामाईक कूपनलिकेचे पाणी मागितल्याच्या कारणावरून एकाने महिलेचा विनयभंग केल्‍याची घटना रविवार दि. 1 डिसेंबर रोजी ईटकूर शिवारात घडला. शिवारात ही महिला व ज्ञानदेव लिंबराज गंभिरे यांचे शेत आहे. दोघांमध्ये सामाईक कूपनलिका आहे. महिला आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सामाईक कूपनलिकेचे पाणी गंभिरे यांना मागितले. मात्र, त्यांनी महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top