उस्मानाबाद : शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने उस्मानाबाद येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सनातन संस्थेच्या स्वाती खाड्ये, मनोज खाड्ये, योगेश महाराज साळेगांवकर, संदीप अपसिंगेकर आदीमान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे विक्रम घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्यंकटेश महाजन महाविद्यालय मैदानावर सायं.५.३०
उस्मानाबाद येथे दि. 20 डिसेंबर रोजी व्यंकटेश महाजन महाविद्यालय मैदानावर सायंकाळी साडे पाच वाजता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जादूटोणा प्रतिबंधक वटहुकुम, धार्मिक हिंसाचारविरोधी कायदा यासारख्या तसेच आगामी निवडणुकामध्ये संघटनेचे धोरण या विषयावर सदरील सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेसाठी स्वाती खाड्ये, योगेश महाराज साळेगांवकर, मनोज खाड्ये, संदीप अपसिंगेकर आदीमान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
व्यंकटेश महाजन महाविद्यालय मैदानावर सायं.५.३०
समितीच्या वतीने देशातील ११ राज्यांत ९१९ हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले असून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ही ५ वी सभा होणार आहे. या सभेसाठी दहा हजार लोक येणार असून या सभामधुन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण व हिंदू संरक्षण हे सत्रांना बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सभेसाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जनजागृती समितीचे विक्रम घोडके यांनी केले आहे.