उस्मानाबाद : तालुक्यातील हनुमान नगर, लासोना येथील दरोडा प्रकरणातील एका दरोडेखोराला जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले असून त्याला तुळजापुर शहरातुन अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, हनुमान नगर,लासोना येथील बाबासाहेब नामदेव पवार यांच्या घरावर दि. ९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या खिडकी तोडुन आतमध्ये प्रवेश करुन बाबासाहेब पवार व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन घरातील कपाटातील रोख रक्कम व चांदीचे दागीणे असा एकुण ११ हजार ४०० रुपयाचा माल चोरुन नेला होता. तसेच बाबासाहेब पवार यांच्यावर दरोडेखोरांनी चाकुने वार करुन गंभिर जखमी केले होते. याबाबत बेंबळी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले, दरोडा प्रतिबंधक पथकाचे एम.आर मोताळे, यांनी पहाणी केली व दरोडेखोरांचा शोध घेत तालुक्यातील सुंभा, येवती, नितळी, लासोना, भागात फिरत असताना पोलीसांना माहीती मिळाली की, तुळजापुर येथील राजा बाब-या भोसले याने सदरील गुन्हा त्याच्या साथीदाराला सोबत घेवुन केला असून तो तुळजापुर येथे फिरत असल्याची माहीती मिळाली.
त्यावरुन पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपअधिक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपानि मोताळे व त्यांचे सहकारी मुकर घायाळ, तानाजी माळी, नाना भोसले, सुनिल कोळेकर, सचिन कळसाईन यांनी तुळजापुर येथे सापळा रचुन दरोडेखोर राजा बब-या भोसले याला अटक केली.
त्याला लासोना येथील चोरीबाबात विचारपुस केली असता त्याने सदरील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम पोलीसांनी त्याच्याकडुन हस्तगत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कडुकर या करीत आहेत.