नळदुर्ग :- भारतीय संविधान हे विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोण शिकविणारे असून प्रत्येकाला आपल्या हक्का बरोबर कर्तव्याचीही जाणीव करून देणारे असल्‍याचे मत जेष्‍ठ समाजवादी विचारवंत पन्‍नालाल सुराणा यानी नळदुर्ग येथे संविधान प्रबोधन सप्ताहाच्या समारोपात बोलताना व्‍यक्‍त  केले.
      नळदुर्ग येथिल कला विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयात शुक्रवार रोजी  संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमात पन्‍नालाल सुराना हे बोलत होते.या कार्यक्रमाच्‍या  अध्‍यक्षस्‍थानी  प्राचार्य डॉ. सुहास पेशवे होते.प्रमुख पाहुणे म्‍हणुन जेष्ठ समाजसेविका विजया चव्हाण  या उपस्थित होत्‍या .
     सामाजिक कार्यकर्त्‍याच्‍यावतीने  दि. 28 नोव्हेंबर महात्मा जोतीबा फुले यांच्‍या स्‍मृतीदिन व दि. 6 डिसेंबर संविधानाचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनांचे औचित्य साधून नळदुर्ग व परिसरात सविधान संवर्धन मंचच्या वतीने, भारतीय संविधान प्रबोधन संप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधन सप्ताहाचे  समारोप नळदुर्ग येथिल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झाले. यावेळी देशातील सामान्य माणसाच्या हक्काची व संरक्षणाची हमी देणारे भारतीय संविधान हे परिवर्तनाचा जाहीरनामा असून संविधनाची प्रास्ताविका म्हणजे तमाम भारतीयांचे संकल्प पत्र आहे. असे त्‍यानी सांगितले.   जेष्ठ समाजसेविका विजया चव्हाण यानी सांगितले की संविधानाच्या माध्यमातून या देशाच्‍या सर्व  महिला व पुरूषांना समानतेचा हक्क मिळालेले असून प्राथमिक शिक्षण हे सर्वासाठी सक्तीचे व मोफत असल्याचा कायदा हा अभिनंदनिय असले तरी या कायदयाची सरकार कडून म्हणावी तसे  अमलबजावणी होत नाही याची खंत  त्यांनी व्यक्त केली.           
     प्रारंभी महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्‍या  प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवर पाहूण्यांचा परिचय अपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांनी करून दिला. यावेळी राष्ट्रसेवादलाचे महादेव गुरव, प्रा. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य आय. एस. भोरे, सामाजिक कार्यकर्ते अरूण लोखंडे, प्रविण राठोड, संगीता गायकवाड, कल्पना गायकवाड, मिना डोळसे, संतोष बुरंगे, बळीराम जेठे, दयानंद काळुंके, आर. एस गायकवाड, सोमनाथ बनसोडे, आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.के. गायकवाड सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे तर आभार  प्रा. शिवाजी बनसोडे यांनी मानले. 
 
Top