कळंब (बालाजी जाधव) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास पाठींबा  देण्यासाठी कळंब तहसील कार्यालयासमोर भ्रष्ठाचार विरोधी जनआंदोलन व आम आदमी पार्टी च्या वतीने एक दिवसाचे उपोषण दि. १३ रोजी करण्यात आले, यावेळी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
      दि. १० डिसेंबर पासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी येथे जनलोक पाल बिलासाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यास पाठींबा म्हणून कळंब येथील भ्रष्ठाचार विरोधी जनांदोलन व आम आदमी पार्टी कळंब यांच्या वतीने कळंब तहसील कार्यालय परिसरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे कळंब तालुका संयोजक श्री दत्तात्रय तनपुरे, कचरू रामभाऊ टकले, सदाशिव दादाराव शिनगारे, उतरेश्वर पाटील, बाबुराव विठ्ठल कवडे, विलास सुरवसे, बब्रुवान गोरे, सुरेश लांडगे, सागर बाराते, अनंत चोंदे, रामलिंग वाघमारे, मचिन्द्र आवाड,  माणिक मोराळे, अमोल गायकवाड, साखरबाई काळे, आदीजण उपस्थित होते. यावेळी आम आदमी पार्टीच्‍यावतीने तहसिलदारांना मागणीचे निवेदन देण्‍यात आले.
 
Top