कळंब (बालाजी जाधव) :- तालुक्यातील हासेगांव (केज) येथे महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरजू महिलांसाठी जाणीव जागृती शिबीर हासेगांव (केज) येथील महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात नुकतेच पार पडले.
जाणीव जागृती शिबीराच्या अध्यक्षस्थानी श्री तुळजाभवानी महिला बचत गटाच्या सचिव सौ. वेणूबाई प्रभुलिंग तोडकर ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड मुंबई यांचे प्रशिक्षण घेतलेल्या सौ. सुशिला तोडकर ह्या होत्या. सौ. तोडकर यांनी ग्रामीण भागातील स्त्रीयांचे समस्या व त्यावर उपाययोजना याविषयी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्री तुळजाभवानी महिला बचतगट, सावित्रीबाई फुले महिला बचतगट हासेगांव (केज) यांचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता साचणे यांनी केले तर सौ. अनिता कोरे यांनी आभार मानले. यावेळी काशिबाई यादव, कमल खरडकर, अर्चना खरडकर, लक्ष्मी तोडकर, स्वप्नाली तोडकर, सुवर्णा तोडकर आदी महिलांनी परिश्रम घेतले.