कळंब (बालाजी जाधव) :- आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्‍या प्रयत्‍नामुळे कळंब तालुक्‍यातील सहा मंडळ केंद्रामधील 22 हजार 504 शेतक-यांना रब्‍बी हंगाम 2012-2013 साठी विमा मंजूर झाला आहे. त्‍याचे क्षेत्रफळ सुमारे 10 हजार 990 हेक्‍टर असे असून तालुक्‍याला मिळणारी एकूण रक्‍कम 6 कोटी 52 लाख 5 हजार 493 एवढी रक्‍कम मिळणार आहे.
    हरभरा, ज्‍वारी बागायत व कोरडवाहू करडई, सुर्यफुल, गहू, (बागायत) कोरडवाहू अशा पिकांसाठी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्‍या प्रयत्‍नातून सदरील रक्‍कम मंजूर करण्‍यात आल्‍याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रामलिंग आवाड यांनी दिली. यावेळी उपनगराध्‍यक्ष पांडुरंग कुंभार, दयानंद गायकवाड, बालाजी जाधवर, गजानन चोंदे, हरिचंद्र कुंभार, भैया बावीकर इत्‍यादी उपस्थित होते.
 
Top