बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सीताफळ महासंघ पुणे यांच्या वतीने होणारी ११ वी राज्यस्तरीय सीताफळ परिषद बीड येथील मानवलोक येथे दि. 10 डिसेंबर रोजी होत असल्याची माहिती अध्यक्ष नवनाथ कसपटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
या एकदिवसीय परिषदेत सीताफळ तज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मानवलोक संस्था, अंबाजोगाईचे कार्यवाह अनिकेत लोहिया हे संयोजक आहेत. सीताफळ महासंघाच्या वतीने आजपर्यंत १० राज्यस्तरीय परिषदा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सद्यसिथतीत ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सीताफळांच्या बागांसाठी व्याप्त आहे. माजी आमदार पाशा पटेल, नॅचरल शुगर रांजणीचे चेअरमन बी.बी. ठोंबरे, जिल्हा कृषि अधिकारी मुळे यांच्या उपस्थितीत दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता याचे उद्घाटन होत आहे. सीताफळाची विक्री व व्यवस्थापन या विषयावर परभणी येथील डॉ. डी.पी. वासकर, अकोला येथील बी.डी. ऐळके, अंबाजोगाई येथील प्रा.सरवदे, प्रा.देवरे, जळगाव येथील बी.डी. जडे, बीड येथील रामेश्वर चांडक हे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. सीताफळ परिषदेसाठी नोंदणी शुल्क १५० आकारण्यात येत असून चहा, व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी चिंतापण कुलकर्णी ८५५४९९३००२, शिवाजी सरवदे ९४२२२४४९५६, देवारे ७५८८०८२०८४ यांच्याशी संपर्क साधावा, या परिषदेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह अनिकेत लोहिया ८५५४९९२९९९९, नवनाथ कसपटे ९८२२६६९७२७ यांनी केले आहे.