बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जीवन आनंदी कसे करावे तसेच कोणत्या बाबींना जीवनात किती महत्व द्यावे याचे प्रबोधन करताना आनंदी जीवनासाठी हसणे गरजेचे असल्याचे मत सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातील सचिव अरुण पाटील यांनी व्यक्त केले.
रविवारी दि. १ डिसेंबर रोजी बार्शीतील पाटील प्लॉट येथे स्थापन झालेल्या स्थानिक रहिवासी मंडळाच्या सोळाव्या मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योजक सुधीर गाढवे, अविनाश सोलवट, विलास जगदाळे, प्रकाश गव्हाणे, प्रताप जगदाळे, विलास बारंगुळे, सतिश गोडगे आदी ङ्कान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शासकीय काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशावेळी आनंदी राहणे अशक्य होते. आज मानवाकडे सर्व भौतिक साधने उपलब्ध आहेत, परंतु तरीही समाधान नाही, आनंदी जीवन जगण्यासाठी काही सुत्रांचा वापर केल्यास दुःखचे प्रसंग दिसणार नाही. यात हसणे हे महत्त्वाचे आहे. आजच्या परिस्थितीत आपण हास्य विसरलो आहे. लहान मुलांचे हसणे, तरुण, पौढ यांच्यात फरक जाणवतो. हसण्यासाठी कोणताही खर्च येत नाही, ते शिकण्याचे गरज पडत नाही, गरज पडल्यास हास्य क्लबची स्थापना करावी, संकटात नकरात्मक भावना निर्माण होतात, यावेळी हसण्याने त्यावर मात करता येते. हसण्याने निरोगीपणा वाढतो, त्यामुळेच लहान मुलांचा उत्साह व आनंद दिसून येतो. हसल्यामुळे अनेक ग्रंथांचे संप्रेरक वाढते व याचा उपयोग नेदनाशामक म्हणूनही होतो. नातेसंबंध हा दुसरा पैलू आहे. रक्ताचे नाते व वैवाहिक नाते सांभाळणे महत्त्वाचे आहे. स्त्री ज्यावेळी प्रसव वेदना सहन करते, त्यावेळी तिला स्वर्ग प्राप्तीचा आनंदही मिळतो, असेही ते शेवटी म्हणाले.