नळदुर्ग -: जागतिक अपंग दिनानिमित्त नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील चैतन्य मुकबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी मुकबधीर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या कार्यक्रमास एसटी कामगार सेनेचे उपजिल्हाध्यक्ष बशीर शेख, शहर उपाध्यक्ष अलीम शेख, अरुण जाधव, रमेश घोडके, गौस कुरेशी, दत्तात्रय धारवाडकर, मुक्तार शेख, सय्यर मुनिरोद्दीन, अब्दुल कुरेशी, इब्राहिम बाडेवाले, समीर शेख, कुदरत शेख, अब्बु शेख, ईसाक जहागिरदार, गौस शेख, छोटू शेख, कुरेशी वसीम, शाळेचे मुख्याध्यापक अलाह एस.एम., शिक्षक पी.एम. मडके, टी.व्ही. वाघमोडे, आर.बी. पवार आदीजण उपस्थित होते.
