नळदुर्ग : समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय आणि धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलेले भारतीय संविधान म्हणजे सामाजिक समतेचा पूरस्कार करणारा सर्व श्रेष्ठ ग्रंथ होय असे प्रतिपादन आपलं घर नळदुर्ग  येथील धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी सिंदगाव (ता. तुळजापूर) येथे आयोजित संविधान प्रबोधन कार्यक्रमात बोलताना केले.
    नळदुर्ग परिसरातील विविध सामाजिक संस्था व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संविधान समर्थन मंचच्या माध्यमातून दि. 28 नोव्‍हेंबर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनापासून ते दि. 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या महापरिर्वान दिनापर्यंत भारतीय संविधान प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संरेश कांबळे  बोलत होते. पूढे बोलताना ते म्हणाले, भारतीय संविधानाने या देशाला, तमाम माणसाला त्यांचे मानवी हक्क घटनात्मकदृष्टया मिळवून दिलेले आहेत. तेंव्हा संविधानाचे संवर्धन करणे ही तमाम भारतीयांची काळाची गरज आहे.
   याप्रसंगी भैरवनाथ कानडे, आर.एस. गायकवाड, यांचेही भाषणे झाली. या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी येथील ग्रा.प. सदस्या निर्मलाताई कांबळे ह्या होत्या. प्रारंभी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचालक राजेंद्र शिंदे यांनी केले व आभार चंद्रकांत शिंदे यांनी मानले. यावेळी संविधान समर्थन मंचचे दयानंद काळुंके, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, लाडूशा शिंदे, मरगू शिंदे, राम कांबळे, लक्ष्‍मण पाटील, मलिक शिंदे, सुधाकर शिंदे, लहू शिंदे, राम गायकवाड यांच्‍यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top