नळदुर्ग : जळकोट (ता. तुळजापूर) येथील माणिकराव रेणुके बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे नळदुर्ग येथे दि. 22 डिसेंबर रोजी माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे.
    स्पर्धेचे आयोजन दोन गटात केले असुन प्रथम गट ६ वी ते १० वी द्वितीय गट इयत्ता ११ वी ते पदवी अशा गटात विद्यार्थ्‍यांना सहभागी होता येणार आहे. उपरोक्त दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना प्रथम गटातील प्रथम विजेता २००० रुपये, द्वितीय १५०० रु. तर तृतीय ७५१ रु. तर द्वितीय गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये रोख रक्कम, संस्थेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते जाहिर कार्यक्रमात देण्यात येणार आहे. शिवाय स्पर्धेतील अन्य सहभागींनाही संस्थेचे प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. दोन्ही गटातील सहभागी स्पर्धकांना प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले असुन अधिक माहितीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय रेणुके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरील स्‍पर्धा नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्‍य मह‍ाविद्यालयात रविवार दि. २२ डिसेंबर रविवार रोजी घेण्यात येणार असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
 
Top