तुळजापूर :- यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्‍याची घटना रविवार दि. 15 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे.
    सचिन शहाजी राठोड (वय 15 वर्षे, रा. मोतीझरा नाग, ता. तुळजापूर) असे मृत विद्यार्थ्‍यांचे नाव आहे. भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित यमगरवाडी येथील आश्रमशाळेत सचिन हा इयत्‍ता आठवीत शिकत होता. रविवारी पाण्यामुळे मृतदेह काढता आला नाही. त्यामुळे सोमवारी विहिरीतील पाणी उपसून मृतदेह काढण्यात आला. याबाबतची नोंद तामलवाडीत पोलिस ठाण्यात झाली आहे.
 
Top