उस्मानाबाद :- पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांची आज सोमवार रोजी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पाटील यांच्या पत्नी अयोध्या पाटील यांचे नुकतेच निधन झाले. पालकमंत्री चव्हाण यांनी पाटील यांच्या भानूनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पाटील यांच्या दोन्ही मुलांशीही चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, विश्वास शिंदे, भाऊसाहेब उंबरे, नानासाहेब निंबाळकर, धनंजय रणदिवे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
