![]() |
| राहुल कुलकर्णी |
उस्मानाबाद -: साई समर्थ केबल सर्व्हिसेसच्या अंतर्गत असलेल्या इन न्यूज केबलच्यावतीने खास उस्मानाबाद करांसाठी रविवार दि. 22 डिसेंबर रोजी भव्य नृत्य व भजन स्पर्धेसह फु बाई फु फेम राहुल कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी साडे
आठ वाजता भजन स्पर्धा सुरु होणार आहेत. भजन स्पर्धा दुपारी तीन वाजेपर्यंत असून प्रत्येक सहभागी भजनी गटास सादरीकरणासाठी दहा मिनिट वेळ मिळणार आहेत. भजन स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रती गटास दोनशे रुपये ठेवण्यात आले असून स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके व सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळणा-या मंडळास पकवाज व टाळ, द्वितीय पारितोषिक म्हणून विना व टाळ आणि तृतीय पारितोषिक म्हणून पाच टाळ देण्यात येणार आहेत.
रविवार दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नृत्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश फी मोफत असणार आहे. नृत्य स्पर्धा ह्या समुह नृत्य, वैयक्तीक सादरीकरण अशा गटात होणार असून प्रत्येक गटास प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी सहा वाजता फु बाई फु फेम राहुल कुलकर्णी यांचे खास वीस मिनिटांचे सादरीकरण येणार आहे. राहुल कुलकर्णी प्रथमच उस्मानाबादेत येत आहेत.
तरी वरील कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन इन केबल परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.


