नळदुर्ग -: नळदुर्ग शहर भाजपाच्यावतीने सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ‘हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे’ या मागणीसाठी लाभार्थ्यांसह शहरातून भव्य मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात आला. यावेळी ‘हक्काचं घरकुल मिळालचं पाहिजे’, ‘एक तर घरकुल नावे करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा मोर्चातील सहभागी लाभार्थ्यांनी जोरदारपणे दिल्या.
एकात्मिक घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी भाजपाच्यावतीने प्रयत्न सुरु असून लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता अखेरच्या क्षणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी नगरपालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, सन 2008 सालापासुन एकात्मिक घरकुल योजनेचे काम प्रलंबित असून लोकवाटा भरलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत घरकुल पासुन वंचित रहावे लागत आहे. लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भाजपाची भुमिका असून घरकुल योजनेत गैरप्रकार करणा-या संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपाच्यावतीने करण्यात आली.
या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस भिमाशंकर हासुरे, माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी, सुशांत भूमकर, संताजी चालुक्य, रणजित डुकरे, पद्माकर घोडके, रवी सुरवसे, किशोर व-हाडे, महिला कार्यकर्त्या शांताबाई माने, मनोज बेले, संजय चव्हाण यांच्यासह नळदुर्ग शहरातील स्त्री, पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. हा मोर्चा वसंतनगर येथून काढण्यात आला. इंदिरानगर, व्यासनगर, राष्ट्रीय महामार्ग, बसस्थानक मार्गे शहरातील मुख्य रस्त्यावरुन भवानी चौक, धर्मवीर संभाजी चौक, शिवाजी चौक, किल्ला गेट, क्रांती चौक, चावडी चौक, शास्त्री चौक या मार्गावरुन नगरपालिका येथे या मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना लाभार्थ्यांच्यावतीने भाजपाने नगरपालिकेच्यावतीने बांधण्यात येणा-या घरकुल योजनेचे काम पूर्ण करुन हक्काचे घरकुल उपलब्ध करुन द्यावे, तसेच घरकुलाचे निकृष्ठ बांधकाम करणा-यावर कारवाई करावी, यासह बारा प्रश्नांचे लेखी उत्तर मागणीचे निवेदन दिले. या निवेदनावर शहरातील 32 नागरिकांचे स्वाक्ष-या आहेत.