कुणीतरी असावं
मला प्रेमानं बघणारं
आलेच जर अश्रू
तर प्रेमान पुसणारं...
मला प्रेमानं बघणारं
आलेच जर अश्रू
तर प्रेमान पुसणारं...
कुणीतरी असावं
तिरक्या नजरेने पाहणारं
मला पाहून
गालातल्या गालात हसणारं...
कुणीतरी असावं
माझी वाट बघणारं
झालाच तर उशीर
तर प्रेमानं रागवणार....
कुणीतरी असावं
हात देऊन चालणारं
लागलीच जर ठेच
तर प्रेमानं जखम भरणारं...
कुणीतरी असावं
प्रेमानं मिठी मारणारं
मनातील निराशा
नाहीसा करणारं...
कुणीतरी असावं
नजरेत नजर मिसळणारं
स्पर्शाचा गंध नि,
प्रेमाचा मोहर दाखवणारं
- स्वप्नील चटगे