बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत अध्यापनानंतर संगीत विषयाचे पुढील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायीक झेप घेत 'तर भिमाची औलाद नाही' भीमगीतांचा अल्बम तयार केला आहे. या अल्बमाचे मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात या अल्बमचे प्रकाशन होत असल्याची माहिती दिग्दर्शक अमर देवकर व गीत, संगीतकार जयभीम शिंदे यांनी शिवाजी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्राचार्य मधुकर फरताडे, संगीततज्ञ सौ. अबोली सुलाखे आदीजण उपस्थित होते. बहुजन व मागासवर्गीयांसाठी थोरपुरुषांनी केलेल्या त्यागाची शिकवण, जाणीव, बदलती समाजव्यवस्था, लोकजागृती, चांगली दिशा, धडपड, प्रेरणा, उर्जा, नाविण्य, कला, संगीत, आदर्श तसेच वस्तुस्थितींचा संगम करत या अल्बमची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार्या नव्या उमेदीच्या कलाकारांना आलेल्या अनंत अडचणी व त्यावर मत केलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी यावेळी केले.
जागेची अडचण असतांना तसेच शहरात कुठेही आसरा मिळाला नसतांना शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी मदतीचा हात पुढे केला. धांगडधिंगा, महापुरुषांची अवहेलना न करता साधी भाषा वापरुन सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सदरच्या अल्बमच्या प्रती बाजारात येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जयभीम शिंदे व सहकार्यांनी बोलतांना सांगितले. इतरांचे अवलोकन करुन त्यापेक्षा चांगल्या दर्जाची निर्मिती आपण करुन व लोकांना नेमकी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते समोर आणून, अत्यंत तुटपुंज्या सोयी सुविधा असतांनाही चांगल्या दर्जाची गाणी निर्मिती करुन बार्शीचे नांव या कलाकारांनी पुढे आणण्याचा प्रयत्न करत बार्शी देखील तसूभरही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या अल्बमची गाणी जयभिम सूर्यभान शिंदे यांनी स्वत: लिहीली असून, याचे दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. अ. रहेमान शेख यांनी कॅमेरामनचे काम तर अतुल लोखंडे, अमोल पाटसकर यांनी कलाकाराचे काम केले आहे. निर्मिती - प्रा. पंकज पवार, मुकूंद जाधव, कार्यकारी निर्माता - मोहित वायकुळे, प्रकाश शिंदे, निर्मिती व्यवस्था़ - गिरीष देवकते, विठ्ठल काळे, सहाय्यक दिग्दर्शक - उमेश मालन, वेशभूषा - मधुरा पानसे, आकाश घोलप, रंगभूषा - पूजा काबे, ध्वनीसंयोजन - महेश क्षीरसागर, निलेश सोनवणे, कॅमेरा सहाय्यक - सुधीर चोपडे आदीजण.
यावेळी प्रा. मधुकर फरताडे, अबोली सुलाखे, सचिन वायकुळे, सचिन आपसिंगकर यांनी समायोचित विचार मांडले.