औरंगाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील विविध कार्यालयातील गट "क" आणि गट "ड" च्या रिक्त जागा भरण्याकरिता 9 फेब्रुवारी 2014 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाव्दारे पाठवण्यात आली आहेत.
उपरोक्त पदांकरिता 10 व 11 सप्टेंबर 2013 रोजी विविध वृत्तपत्रात जाहिरातआणि 3 डिसेंबर 2013 रोजी शुध्दीपत्रक प्रसिध्दीस देऊन उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. गट "क" मधील लिपिकवर्गीय पदासाठी ज्या उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत, त्यांची लेखी परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी स.भु. कला -वाणिज्य महाविद्यालयात सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असून गट "ड" मधील शिपाई-संदेशवाहक इत्यादी पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षाही स.भु. कला-वाणिज्य महाविद्यालयात होईल.
या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयातील सूचना फलकावर डकविण्यात आली असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही ती प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना औरंगाबाद येथून प्रवेशपत्रे पाठविण्यात आलेली आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त होण्यासाठी पुरेशी प्रतीक्षा करावी आणि जर पोस्टाव्दारे प्रवेशपत्र प्राप्त झाले नाही तर छायाचित्र तसेच ओळखपत्राच्या प्रतीसह शनिवार,दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेत संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालालय,मराठवाडा विभाग, अरिहंत बिल्डींग, सिटीजन हॉटेलच्या समोरील गल्ली, खडकेश्वर, औरंगाबाद येथे समक्ष संपर्क साधून प्रवेशपत्राची दुय्यम प्रत घेऊन जावी. प्रवेशपत्राची दुय्यम प्रत उमेदवारालाच दिली जाईल, अन्य कोणासही ती दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
परीक्षेच्या कालावधीत उमेदवारांना मोबाईल आणि तत्सम संपर्क साधने वापरण्यास सक्त मनाई आहे, याचीही नोंद घेण्याचे आवाहन करण्यात येते.