उस्मानाबाद :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद आयोजित पुणे, जिल्हयातील खाजगी क्षेत्रातील उद्योजक/कंपनी यांचेकडील विविध पदे भरण्यासाठी गुरुवार, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10-30 वा. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उस्मानाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पुरुष व महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
         या मेळाव्यात जिल्ह्यातील पुरुष व महिला बेरोजगार उमेदवारांसाठी 4 उद्योजक 330 पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून निवड प्रक्रिया करणार आहेत.
डेक्कन मॅनेजमेंट कन्सलन्टन्स ,फिनिशिंग स्कुल, इंद्रावणे पुणे अंतर्गत याझकी इंडिया  लि. वाघोली, पुणे यांचेतर्फे 100 पदावर पुरुष व महिलांसाठी एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. किंवा आय. टी. आय. कोणताही ट्रेड उत्तीर्ण  उमेदवार जॅाब ट्रेनी पदासाठी मुलाखती देऊ शकतील.
        महिंद्रा कोनव्हर्स लि पीरंगुट, पुणे हे  ट्रेनीची 50 पदे भरणार आहेत. त्यासाठी एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. किंवा आय. टी.आय. कोणताही ट्रेड उत्तीर्ण,  18 ते 30 वयोगट अशी पात्रता आहे.
      साणसवाडी पुणे  येथील कल्याणी फोर्ज लि., यांचेतर्फे जॉब ट्रेनिची 100 पदासाठी 18 ते 30 या वयोगटातील  एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. किंवा आय. टी. आय. कोणताही ट्रेड उत्तीर्ण  उमेदवारांची  निवड करण्यात येईल.
       महिंद्रा हिनोदय इंडस्ट्रीज लि. उर्से, ता मावळ, जि. पुणे यांचेकडे ट्रेनिची 80 पदासाठी 18 ते 25 वयोगटातील एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. किंवा आय. टी. आय. कोणताही फिटर,मोल्डर,इलेक्ट्रीशियन,टर्नर,मशिनिष्ठ आदि ट्रेड उत्तीर्ण उमेदवार  जॅाब ट्रेनी पदासाठी मुलाखती देऊ शकतील.
      कॅन्टीन ,निवास, ट्रान्सपोर्टेशन आदि सोयी, सुविधा संबंधित कंपनीच्या नियमानुसार प्रत्यक्ष मुलाखतीचे वेळी कंपनीचे अधिकारी  माहिती देतील.  वरील पदासाठी पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारानी त्यांचे शैक्षणीक पात्रता, वय, अनुभव आदि मुळ प्रमाणपत्र व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड ,पासपोर्ट आकाराचे फोटो ,स्वत:चा बायोडाटा आदि कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top