बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ज्ञानसागर बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या जय माता दी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या हस्ते करण्यात आले. 
        यावेळी डॉ. बोपलकर, अध्यक्ष दिनेश घोलप, सचिव दिनेश मेटकरी, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, अमोल काटकर, नितीन सांळुंके, दत्ता नायकू, काका झालटे उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगतात बदलत चाललेल्या संस्कृतीला वाचनाशिवाय पर्याय नसल्याने हा संस्थेचा उपक्रम सर्वाच्या मनात वाचनाविषयी आवडीचा ठरेल तसेच या उपक्रमाला आपले योग्य ते पाठबळ राहिल असल्याचे अतुल भोस यांनी म्हटले.
    वाचनालयामुळे परिसरातील नागरिकांना वाचनाची आवड निर्माण होईल, संस्थेच्या वतीने इतरही विविध उपक्रम राबिवले जाणार असल्याचे महादेव मेटकरी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी कोकाटे, सुनिल यादव, सचिन गुरव, बाळासाहेब आवाड, शहाजी मोरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top