बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मालेगाव (ता. बार्शी) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची फिर्याद पिडीत मुलीने स्वत: पोलिसांना दिल्याने वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवार दि.२६ ते सोमवार दि.२७ च्या सुमारास सदरची घटना घडली.
वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी विलास करंडे असे तक्रारीतील बलात्कार करणार्या तरुणाचे नाव आहे. यातील आरोपीने अमर पाटील यांच्या शेतामधील चिंचेच्या झाडाखाली पिडीत मुलीच्या मनाविरुध्द अतिप्रसंग व बलात्कार केला. याप्रकरणी अनुसूचित जाती (अ) कायदा क ३(१) (१२), ३(२), (५) १ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्स्युअल ऑफेसेन्स ऍक्ट क्र. ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत मुलीस वैद्यकिय तपासणीसाठी सोलापूर येथे शासकिय रुग्णालयात नेण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरच्या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार हे करीत आहेत.