बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : खांडवी (ता. बार्शी) येथील सोजर शिक्षण संकुलाच्या कस्तुरबा गांधी मुकबधिर शाळेत देशाचा ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 
    यावेळी सुनिल भराडिया यांच्या हस्ते ध्वजवंदन केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश पिसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना रग, सतरंजी आदि साहित्य तर भआडिया यांच्या वतीने जलशुध्दीकरण यंत्र देण्यात आले. संस्थाध्यक्ष अरुण बारबोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री.सावंत, राऊत, शेलार, थोरे, करपे आदी शिक्षक उपस्थित होते.
 
Top