बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील पाटील प्लॉटमधील सहयोग मित्रमंडळाच्या वतीने रवि फौंडेशनचे मधुकर डोईफोडे यांच्या प्रेरणेने घरोघरी ध्वजवंदन करुन राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
सुमारे शंभर घराच्या उंच ठिकाणी एकाच वेळी प्रजासत्ताक दिनादिवशी सकाळी ७ च्या सुमारास देशभक्तिमय वातावरणात ध्वजवंदन करण्यात आले. यावेवेळी राष्ट्रगीत म्हणून लहान मुलांसह घरातील प्रत्येक सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन बार्शीकरांना राष्ट्रीय सणाचे महत्व पटवून सांगीतले आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, उपाध्यक्ष सतिश गोडगे, मार्गदर्शक अविनाश सोलवट, सचिव प्रकाश गव्हाणे, कोषाध्यक्ष रामदास तिकटे, सहसचिव राहुल बनसोडे यांच्यासह मंडळाचे सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.