उस्मानाबाद :- प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस संचलन मैदानावर सकाळी 9-15 वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
     जास्तीत जास्त नागरिकांना या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी 8-30 ते सकाळी 10 या कालावधीत इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला  ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8-30 पूर्वी आणि सकाळी 10 नंतर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृपया सर्व नागरिकांनी वेळेपूर्वी 10 मिनीटे अगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पोलीस परेड तसेच संचलन होणार आहे. याशिवाय विविध विभागांचे चित्ररथ या संचलनात सहभागी होणार आहेत.
       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते सकाळी 8-15 वाजता आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8-25 वाजता अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
     जिल्हा परिषद येथे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते सकाळी 8-15 वाजता तर नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्षा रेविता बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 7-50 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.       
 
Top