मुंबई -: राज्यातील 15 जिल्ह्यांतील नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अल्पसंख्यांकांशी संबंधित विकासकामांसाठी 3 कोटी 9 लाख रूपयांचे अनुदान शासनाने मंजूर केले असून ते संबंधित जिल्हाधिका-यांकडे देण्यात येत आहे. या अनुदानामुळे विविध ठिकाणांच्या अल्पसंख्याक क्षेत्रातील विकास कामांना गती मिळणार आहे.     
      अल्पसंख्याक विकास विभागाने राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात 69 नगरपालिका व महानगरपालिकांना अनुदान देण्यात आले.  आता दुस-या टप्प्यात 15 जिल्ह्यामधील 31 नगरपालिका व महानगरपालिकांना 3 कोटी 9 लाख 10 हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात येईल. 
हे अनुदान मिळालेल्या नगरपालिका खालीलप्रमाणे आहेत:
रत्नागिरी जिल्हा - लांजा नगरपंचायत, अहमदनगर - पाथर्डी, कोपरगांव, श्रीगोंदा नगरपालिका, धुळे-दोंडाईचे-वरवाडे, जळगांव-चोपडा नगरपालिका, पुणे-इंदापूर नगरपालिका, सातारा-रहिमतपूर नगरपालिका, सोलापूर-दुधनी, मंगळवेडा, मैंदर्गी नगरपालिका आणि सोलापूर महानगरपालिका, नांदेड-भोकर, देगलूर, मुदखेड,अर्धापूर नगरपालिका, हिंगोली-कळमनुरी, वसमतनगर नगरपालिका, लातूर-औसा, निलंगा नगरपालिका, बीड-परळी वैजनाथ नगरपालिका, अमरावती-धामणगांव रेल्वे, शेंदूरजनाघाट,मोर्शी चिखलदरा, अचलपूर नगरपालिका, अकोला-अकोट नगरपालिका, बुलडाणा-लोणार, सिंदखेडराजा नगरपालिका, गडचिरोली-देसाईगंज, गडचिरोली नगरपालिका
         या अनुदानातून या भागातील काँक्रीट रस्ते बांधणे, नाल्या बांधणे, वीजेचे खांब बसविणे स्मशानभूमी, कब्रस्तान येथे पथदिवे बसविणे, संरक्षण भिंती बांधणे आदी कामे केली जाणार आहेत.
 
Top