कळंब : कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणार्या पत्रकारांचा मंगळवारी येथील मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शिवाजी कापसे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्षएस.एम.देशमुख, जेष्ठ पत्रकार देशपांडे, रणजीत खंदारे, श्रीपाद सबनीस, जयप्रकाश दगडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, उपप्राचार्यडॉ.डी.एस.जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी पुढील वर्षीपासून या संघाच्या वतीने शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी कै.शिवशंकर आप्पा धोंगडे जिल्हास्तरीय पुरस्कार, कै.राई काकडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार आणि कै. गणेश घोगरे स्मृती पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यात अनंत आडसूळ, उन्मेष पाटील व सुनील पाटील यांना सन २0१0-११तर चंद्रसेन देशमुख, अमरसिंह भातलवंडे व सुखदेव गायके यांना २0११-१२ मधील पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.याशिवाय दूरचित्रवाणी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राहुल कुलकर्णी व महेश पोतदार यांना देण्यात आले.कळंब जन्मभूमी असलेल्या परंतु इतरत्र पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणार्या बालाजी निरफळ, संतोष देशपांडे, शिवाजी कांबळे आदींचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख रामलिंग आवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.प्रवीण यादव, युवा सेनेचे बालाजी जाधवर, प्रा.बाळकृष्ण भवर, बाळकृष्ण तांबारे, सलिम मिर्झा, राजेंद्र मुंडे, रोटरीचे प्रा.संजय घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय घोगरे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकार्यांची उपस्थिती होती.