मुंबई -: सुधाकर डोईफोडे यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीतील झुंझार पत्रकार हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री सद्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी स्वित्झरलँडमघ्ये दावोस येथे गेले आहेत. तेथुन दिलेल्या शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, डोईफोडे यांचा उत्तम व्यासंग होता. त्यांची लेखन शैली आकर्षक होती. मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी तळमळीने विविध व्यासपीठावर अभ्यासपूर्ण आणि आग्रही भूमिका सातत्याने मांडली. त्यांच्या निधनाने व्यासंगी, बहुश्रुत आणि शैलीदार लेखणी असलेल्या प्रभावी व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. पत्रकारिता करीत असताना विकासाच्या प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिकाही त्यांनी घेतली. नव्या पिढीतील पत्रकारांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पत्रकारितेचे मूल्य आत्मसात करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील. श्री. डोईफोडे यांनी तरुण वयातच पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या क्षेत्रात राहिले. विविध संस्था आणि संघटनांमध्ये ते क्रियाशील होते. एक अभ्यासू कार्यकर्ता-संपादक ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहील, असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.