उस्मानाबाद -: शहरातील खाजानगर येथील नवविवाहित तरुण सरफराज शेख याचा मृतदेह मंगळवारी बेंबळी रोडवरील एका विहिरीत संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. यामुळे सरफराज याने आत्महत्या केली नसून, त्याचा खून करण्यात आला असल्याची तक्रार त्याचा भाऊ शेख जावेद युसूफ याने पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रविवारी दि.19 जानेवारी रोजी सरफराज याचे बेंबळी येथील मुलीशी लग्न झाले. यामुळे तो आनंदी होता. लग्नाच्या रात्री तो खाण्यासाठी मिठाई आणण्यासाठी गेला परंतु, परत आला नाही. त्याचा मृतदेह बुधवारी शहराजवळील विहिरीत आढळला. वास्तविक पाहता या विहिरीवर आदल्या दिवशी पाहणी करण्यात आली होती. मात्र तेथे काहीच नव्हते. परंतु, दुसर्या दिवशी तेथे सरफराजचा मृतदेह आढळल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच रविवारी दुपारी लग्नानंतर त्याच्या मेहुण्याने त्याच्याशी बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली, रात्रीही काही तरुण त्याच्यासोबत होते. त्यामुळे तो तणावाखाली असल्याचा आरोप करून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून याप्रकरणी गुन्हा नोंद करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे.