उस्मानाबाद -: येथील स्वयंवर मंगल कार्यालयात प्रविण मसालेवाले पुणे व श्री माऊली एजन्सी, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २३ जानेवारी २०१४ रोजी जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांसाठी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत उत्साही वातावरणात हा मेळावा संपन्न झाला.
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे लक्ष्मीकांत जाधव, संजय मंत्री, प्रविण मसालेवाले तर्फे रिजनल सेल्स मॅनेजर संजय देशमुख, शंकर वाडकर, प्रविण मसालेची संपूर्ण टीम उपस्थित होती. याप्रसंगी जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी लकी ड्रॉ तसेच सुनहरी यादे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी सुनहरी यादे या ऑर्किस्ट्रा कंपनीने सादर केलेल्या उत्कृष्ट गायनाने तसेच नृत्याने व्यापारी बांधवांना त्यांच्या तालावर थिरकण्यासाठी प्रवृत्त केले. कार्यक्रमात नवीन व जुन्या गाण्यांची तसेच मराठमोळ्या लावणी नृत्यासह झालेला हा कार्यक्रम म्हणजे व्यापारी बांधवांसाठी एक पर्वणीच ठरली. यावेळी व्यापारी बांधवांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कूपनची सोडतही कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आली.
    सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मसालेवाले, पुणे तसेच सोलापूर येथील पूर्ण स्टाफ व उस्मानाबाद येथील श्री माऊली एजन्सीचे मुख्य वितरक सुनील घाडगे, जावेद पठाण, संजय देशमुख, शंकर वाडकर यांच्यासह उस्मानाबाद येथील श्री ग्रुपमधील सर्वांनीच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top