पांगरी (गणेश गोडसे) -: शंभर रूपयांच्या किरकोळ कारणावरून बोलावुन घेऊन दोघांनी मिळुन एकाला चाकुने मारून जखमी केल्याची घटना शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी शिराळे (ता. बार्शी) येथील चौकात घडली.
    कचरूदीन राजु शेख (वय 54, रा. शिराळे, ता. बार्शी) असे चाकु हल्यात जखमी झालेल्याचे नांव आहे. खाजुदीन इसाक शेख व राजु इसाक शेख अशी चाकुहल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
    जखमी कचरूदीन शेख यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते गावातील चौकातुन त्यांच्या घराकडे जात असताना आरोपी खाजुदीन शेख व राजु शेख यांनी त्यांना दुकानासमोर बोलावुन घेऊन त्यांच्याकडे असलेल्या 100 रूपयांची मागणी केली. कचरूदीन शेख यांनी घरी जावुन पाहतो असे म्हटले असता त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना चाकुने मारूण जखमी केले. पांगरी पोलिसात दोघांविरूध्‍द चाकुने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Recent News

 
Top