तुझसाठी हे माते
ढालही तुटली, हातही तुटले
परी न सुटले पाते
छातीमध्ये घुसल्या गोळ्या
कितीतर गळ्यात फासे
पाहून त्यांच्या धैर्य मनीचे
काळ उभा आ वासे
कितीक लढले,
कितीक घडले...
जखमांचा ना हिशेब येथे
ना गद्दारांची कमी
पुन्हा पुन्हा जखमी होते
माझी भारतभूमी
कितीक लढले,
कितीक घडले...
तुझसाठी हे माते
ढालही तुटली हातही तुटले
परी न सुटले पाते
अंधकार हा दाटू पाहे
मार्ग कुठे ना दिसे
न सुटलेल्या पात्याचे
होऊ न दे तू हसे
- भगवंत सुरवसे, नळदुर्ग
मो. 9763830982