बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मौजे शेलगाव (मा.) ता.बार्शी येथील भोंदूबाबा नारायण मारुती मारकड उर्फ नारायणदेव यांच्या विरोधात रमेश खांडेकर यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अज्ञोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अंतर्गत फौजदारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. 
     सदरच्या कायद्याची अंमलबजावणी झज्ञल्यापासून या प्रकारच्या गुन्हयाबाबत सोलापूर जिल्ह्यातील हा पहिल्यांदाच खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नारायण मारकड यांनी जादूटोणा, काळी जादू यांच्या भितीने धमकी देत दहशत पसरवल्याची तक्रार रमेश खांडेकर यांनी पांगरी पोलिसांत लेखी दिली परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी ऍड्.प्रशांत शेटे यांच्या मार्फत फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश व्ही.बी.मुल्ला यांच्या कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे..
 
Top