बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अडविण्यात आलेले गटारीचे सांडपाणी सुरळीत करणार्या नगरपालिका अधिकारी, कर्मचार्यांसह राजकीय व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने बार्शीत राजकिय खळबळ उडाली आहे. सदरच्या राजकिय नाट्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला, सुमारे दिड ते दोन हजार संख्येच्या जमावाने दहशतीचा प्रयत्न करत एका दुकानावर डगडफेक केल्याने शहरातील अनेक दुकाने बंद करण्यात आली व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील कुर्डूवाडी रस्त्यावरील हॉटेल निकीता शेजारुन जाणार्या अंतर्गत रस्त्याच्या कोपर्याला सार्वजनिक जागेवरील अतिक्रमित घर आहे. याच्या चिटकून सार्वजनीक सांडपाण्याची गटार जाते. मागील काही वर्षांपासून या जागेवर असलेल्या घराच्या अतिक्रमणाने मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहण्यास अडथळा येत असल्याची तक्रार आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे केली होती. तक्रारीनुसार नगरपालिका अधिकारी व कर्मचार्यांनी रितसर पोलिसांना पत्र देऊन पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. बार्शी पोलिसांनी सदरच्या बंदोबस्तास दोन वेळा पुढील तारखा दिल्या. शेवटी बुधवारी दिलेल्या तारखेनुसार नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी कामकाज सुरु केले, यावेळी गटारीच्या वर अतिक्रमणाच्या घराची एक बाजू येत असलेले पत्रे काढण्यात आले व गटारीचे पाणी पुढे नेण्याची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दि करुन ते घर पूर्णपणे काढण्यात येत आहे. आपलेही घर पाडण्यात येईल या भितीने मोठा गोंधळ सुरु केला. त्यापैकी काहीजणांनी त्यांचे नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. राऊत यांच्याबरोबर थोडा जमावही आला यावेळी सदरच्या घरातील महिला शहाबाई विवेकानंद जगताप यांना बरोबर घेऊन झोपडपट्टीतील सर्व गर्दी पोलिस ठाण्यात आले. यावेळी त्यांनी नगरपालिकेचा कर भरत असलेल्या पावत्या सोबत आणल्या. सदरच्या रस्त्यालगत यापूर्वीची नॅरोगेज छोटी रेल्वे धावत होती. मीटरगेज रेल्वे सुरु झाल्यानंतर त्याचा मार्ग बदलल्याने गावातून जाणार्या लाईनचे काम बंद झाले.
सदरच्या रेल्वेच्या मालकीच्या जागेत असलेल्या अतिक्रमणाच्या जागेखालून पूर्वीपासूनची सार्वजनीक गटार गेली आहे. या जागेत राहत असलेल्या महिलेसोबत आलेल्या जमावानंतर पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार यांच्यासमक्ष जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, सामानाची नासधूस इत्यादींचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोप करण्यात आलेले नेताजी सोलवट, नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवकचे सचिव नागेश अक्कलकोटे, मुख्याधिकारी लांघी, नगरपालिकेचे कर्मचारी खोडके व शब्बीर वस्ताद यांचा समावेश आहे. सदरच्या तक्रारीची नोंद करुन गुन्हा दाखल न केल्यास बाहेर जमलेला जमाव सर्वसामान्यांचे नुकसान करतील आणि सर्व जमाव पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसेल, मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे काही जणांनी सांगीतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे कबूल केले. तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी नसलेल्या व्यक्तींची नावे खोट्या गुन्ह्यात घेऊन सार्वजनिक शांतता भंग करुन सर्वसामान्य व्यापारी व इतरांना त्रास दिल्याने नावे आणि गुन्हा वगळण्यात यावा, दहशत माजवणार्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताबाहेर जात असल्याने अतिरिक्त कुमक मागवली आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनीही बार्शीतील घटनास्थळाला भेट दिली.