![]() |
राजेंद्र राऊत |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश डावलून बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरणी माजी आमदार राजेंद राऊत, नगरसेवक दिपक राऊत, आण्णा शिंदे, काका फुरडे, लखन सावळा शिंदे, राहुल यादव उर्फ रज्जा, सोन्या उर्फ सोनू हाजगुडे, सोमा राऊत, सागर धर्मराज मगर, कुमार डमरे व इतर अनोळखी आठशे ते एक हजार इसमांविरोधात सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल मुरलीधर भोस यांनी गुन्हा दाखल केला आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा जमाव जमवून पोलिस स्टेशनजवळील हॉटेल पारिजात व हॉटेल अमर यांच्या दुकानावर दगड मारुन काचा फोडण्यात आल्या, नेताजी सोलवट, नागेश अक्कलकोटे, मुख्याधिकारी लांघी, लोखंडे इंजिनिअर, शब्बीर वस्ताद व इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी रस्त्याच्या मधोमध बसून रहदारीस अडथळा निर्माण केला, घोषणा देण्यात आल्या व दहशतीने दुकाने बंद करण्यास भज्ञग पाडले व जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सरकारतर्फे नोंदविलेल्या फिर्यादित भा.दं.वि.१४३, १४९, ३४१, ३३६, ४२७, क्रिमीनल अँड अमेंडमेंट ऍक्ट १९३२ चे कलम ७, व मुंबई पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.