बार्शी (मल्लिकर्जून धारुरकर) : संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थ्यांना व समाजाला शिक्षण देणार्या निवृत्त शिक्षक गिरीधरलाल तातेड यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी स्वत:च्या मुलास किडनीदान केले आहे.
बार्शी टेक्निकल हायस्कूल येथे हिंदी विषयाचे निवृत्त शिक्षक गिरीधरलाल तातेड यांचा मुलगा जितेंद्र यास ५१ व्या वर्षी किडनीचा त्रास उद्भवल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपन करण्याचा सल्ला दिला. पिंपरी चिंचवड पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दोन महिने डायलेलीसचा उपचार करुन किडनीचा शोध घेण्यात आला परंतु शरिरास जुळणारी किडनी उपलब्ध न झाल्याने शेवटी वडिलांची किडनी तपासून पाहिली. वय आडवे आले असले तरी शारिरीक क्षमता तपासून डॉक्टरांनी किडनी जुळत असल्याने प्रत्यारोपनाचा सल्ला दिला. जगातील दुसरे आणि देशातील सर्वात वयोवृध्द किडनीदाते ठरलेल्या गिरीधरलाल तातेड यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता आपल्या मुलाच्या जीवाचा विचार करुन आणखी एक शिक्षणाचा धडा समाजाला दिला आहे.