अभय दिवाणजी
सोलापूर :- सलाम पुणे संस्‍थेच्‍यावतीेन दिला जाणारा उत्‍कृष्‍ट पत्रकार पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ पत्रकार अभय दिवाणजी यांना जाहिर झाला आहे. शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता पुण्‍यातील नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात या पुरस्‍काराचे वितरण होणार आहे.
        सलाम पुणे संस्‍थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिले जातात. यावर्षीचा सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपटाचा पुरस्‍कार दुनियादारी  चित्रपटाला, साहित्‍य अाणि कला विभागाचा पुरस्‍कार विश्‍वास पाटील, शैक्षणिक प्रा. प्रफुल्‍लचंद चाटे यांना तर उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार पत्रकार अभय दिवाणजी, अविनाश गोडबोले व नंदकुमार सुतार यांना जाहिर झाला आहे. या कार्यक्रमास प.पू. भैय्यूजी महाराज, विधानसभा उपाध्‍यक्ष वसंत पुरके, स्‍वाभिमानी संघटनेचे अध्‍यक्ष नितेश राणे आदींची उपस्थिती राहणार आहे.
 
Top