उस्मानाबाद :- सावकारी नियमासाठी एक सुधारीत व व्यापक तरतूदीचा कायदा 16 जानेवारी, 2014 पासून राज्यात सर्वत्र लागू करण्यात आला आहे. जनतेस व शेतकऱ्यांना या कायद्याची तोंड ओळख होण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. यात नवीन सावकारी कायद्याची संक्षिप्त माहिती दिली आहे. या पुस्तीकेचे वाचन प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत 26 जानेवारी रोजी  करण्यात येणार आहे.
      सर्व जनतेनी व शेतक-यांनी ग्रामपंचायतीच्या स्तरावर आयोजित ग्रामसभेस उपस्थित राहून नवीन सहकारी कायद्यातील तरतूदीविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एस.पी.बडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे  केले आहे.
 
Top